क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

आईवर जीवघेणा हल्ला,तीन वेळा त्याने आईला चाकूने भोकसलं


नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन पासून तो मानसिक रोगी झाला होता. मानसिक त्रासात सुफीयानने दोन ते तीन वेळा विचित्र असे कृत केले होते. घरातील इतर नातेवाईक त्याची मोठी काळजी घेत होते. लॉकडाऊन पर्यंत त्याची मानसिक परिस्थिती चांगली होती पण लॉकडाऊनपासून त्याची मानसिक परिस्थिती बिघडली होतीसाेलापूर शहरातील एका मुलानं आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महिलेस तातडीने रुग्णालयात दाखल केले. मृत्यूशी झुंज देणा-या महिलेचा मूलगा हा मनाेरुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे.
लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेला सुफीयान शेख हा मानसिक रोगी झाला होता. आज (बुधवार) सकाळी त्याने जन्मदाती आई जरीना अस्लम शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. घरात ठेवलेल्या चाकुने तब्बल तीन वार करत त्याने आईला भोकसलं. नातेवाईकांनी ताबडतोब जखमी जरीना यांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे. जरीना या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.
जरीना या आज घरात सकाळी रोजच्या प्रमाणे झाडू मारत होत्या. सुफीयान हा आईवर अज्ञात कारणावरून चिडून होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने घरातील चाकु घेतले आणि पाठीमागून येत आईवर जीवघेणा हल्ला केला. मानेवर,पाठीवर आणि कंबरेवर असे तीन वेळा त्याने आईला चाकूने भोकसलं आणि तेथून पळ काढला. त्यानंतर तो स्वतः जेलरोड पोलीस ठाण्यात हजर झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button