हत्या करत त्याचं मुंडकं तलवारीने कापले आणि सिमेंटच्या पोत्यात भरले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लखनौ : विवाहित मुलीचे लग्नानंतरही मित्रासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलीच्या वडिलांनी मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.
मेरठमधील परीक्षितगड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दीपक त्यागी या युवकाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत होते. पण, पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते. दुसरीकडे हिंदू संघटना, त्यागी समाज आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले होते. पण, तपासाअखेर जे सत्य समोर आले त्याने सर्वांनाच धक्का बसला.

दीपक त्यागी या युवकाची हत्या त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी केली होती. आरोपी वडिलांना त्यांच्या मुलीचे लग्नानंतरही अनैतिक संबंध असल्याचा संशय आला होता. दीपकची हत्या करत त्याचं मुंडकं तलवारीने कापले आणि सिमेंटच्या पोत्यात भरले. शेतामध्ये एक खड्डा खांदून त्यामध्ये ते पुरले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत आरोपी वडिल आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.