मुंबई : नवी मुंबईमध्ये कोट्यवधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. डीआरआयने ही धडक कारवाई केली आहे. वाशीमध्ये संत्र्याच्या टेम्पोमधून ही तस्करी होत होती.
जवळपास 198 किलोग्राम चे क्रिस्टल मेथांफेटामाईन आणि नऊ किलोग्राम कोकीन ताब्यात घेण्यात आलं आहे. या अंमली पदार्थांची किंमत ही 1476 कोटी इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.