क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी


मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्यासाठी कट रचला जात असल्याची माहितीही गुप्तचर विभागाला मिळाली आहे.
माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांना यापूर्वी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

नलक्षलवाद्यांकून धमकी

महाविकास आघाडी सरकार काळातही गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button