आमिर तबेल्यात म्हशीला आंघोळ घालत असताना मुस्कानने आमिरला प्रपोज केले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आमिर तबेल्यात म्हशीला आंघोळ घालत असताना मुस्कानने आमिरला प्रपोज केले. मुस्कानने सांगितले की, तुम्ही मला आवडू लागला आहात आणि तुमच्याशी लग्न करु इच्छित आहे, हे ऐकून आमिराला क्षणभरासाठी धक्का बसला.

प्रेमात गरीब-श्रीमंत भेदभाव नसतो असतं ते निव्वळ प्रेम. अशाच एका प्रेमीयुगुलाची प्रेमकहाणी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात चर्चेत आली आहे. वीस वर्षाच्या मुलीने आपल्या नोकरासोबत लग्न केल्याची अजब प्रेमकहाणी पाहायला मिळाली आहे.
तिने जनावरांची देखभाल करण्यासाठी नोकर ठेवला आणि त्याच्या प्रामाणिकपणावर तिचे प्रेम जडले आणि दोघांनी लग्न केले.

मुलीचे नाव मुस्कान आहे आणि ती पाकिस्तानमधील पंजाब येथे राहणारी आहे, मुस्कानने युट्युब व्हिडीओमध्ये सांगितले की कसे तिला 25 वर्षाच्या आमिरवर प्रेम जडले. आमिरला त्याने आपल्या घरातील म्हैशींना सांभाळण्यासाठी ठेवले होते. मुस्कान सांगते की, त्यांच्याकडे चार म्हशी होत्या. ज्याच्या देखभालीसाठी आमिरला कामावर ठेवले होते. आमिर फार प्रामाणिक होता आणि ते काम तो मनापासून करायचा. तो आल्यापासून म्हैस जास्त दूध देऊ लागल्या होत्या. मुस्कान आमिरच्या कामामुळे आनंदी होती आणि हळूहळू तिला आमिर आवडू लागला. एकदिवस तिने हिंमत एकवटून आमिरला मनातली गोष्ट सांगितली.

जेव्हा आमिर तबेल्यात म्हशीला आंघोळ घालत असताना मुस्कानने आमिरला प्रपोज केले. मुस्कानने सांगितले की, तुम्ही मला आवडू लागला आहात आणि तुमच्याशी लग्न करु इच्छित आहे, हे ऐकून आमिराला क्षणभरासाठी धक्का बसला. मुस्कानने उत्तरासाठी आमिरला संध्याकाळपर्यंतचा वेळ दिला. संध्याकाळी आमिरने घरच्यांशी सल्लामसलत करत मुस्कानची मागणी स्विकारली.

20 वर्षांची मुस्कान घरात एकटी आपल्या आईसोबत राहते. तिच्या आईनेही नोकरासोबत लग्न करण्यासाठी नकार दिला नाही. आमिरसोबत लग्नानंतर मुस्कानने म्हशीची देखभाल करण्यासाठी आणखी तीन लोकांना ठेवले आहे. ती बोलते, लग्नानंतर आमिरचा स्वभाव आणखी कळल्याने त्याच्यावरचे प्रेम वाढले. तर आमिर सांगतो मुस्कानसोबत लग्न केल्याने त्याला सगळं काही मिळाले आहे.