दारु पार्टी,मित्राने मित्रला सांगितले, मला तुझ्या बायको सोबत संबंध ठेवायचे मग काय?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कल्याण: टिटवाळ्य़ात घडली घटना दारु पार्टी सुरु असताना एका मित्रला दुसऱ्या मित्रला सांगितले, मला तुझ्या बायको सोबत संबंध ठेवायचे आहे.

हे ऐकताच धारदार शस्त्र घेऊन मित्रने दुसऱ्या मित्रचा जागीच जीव घेतला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने टिटवाळा पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणत आरोपी सागर खरात याला नाशिकहून अटक केली आहे. मयत तरुणाचे नाव महेश साबळे असे होते.
27 सप्टेंबर रोजी टिटवाळयातील सावकरनगर परिसरात एका बंद घरात टिटवाळा पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. परिसरात दरुगधी पसरली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरु केली. या व्यक्तीचा हे पोलिसांना प्रथमदर्शनाची पाहता कळून आले. टिटवाळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक दिलीप देशमुख अन्य पोलिस कर्मचाऱ्यानी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांचा माहितीनंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक होती. ज्या प्लॅटमध्ये महेश साबळे याचा मृतदेह आढळून आला होता. त्या फ्लॅटमध्ये खरात कुटुंबियातील एकातरुणाने आत्महत्या केली होती. त्या फ्लॅटला कुलूप लावून कुटुंबीय नाशिकला निघून गेले होते.

22 सप्टेंबर रोजी सागर खरात नावाचा व्यक्ती त्याची पत्नी आणि मुलांसोबत टिटवाळा येथील सावकरनगरला परतला. या दरम्यान एके दिवशी रात्री त्याच्या घराखाली त्याचा जुना मित्र महेश साबळे त्याला भेटला. दोघानी दारु पार्टी केली. हॉलमध्ये दारु पार्टी सुरु असताना महेश साबळे याने सागरला सांगितले मला तुझ्या पत्नीसोबत संबंध ठेवायचे आहे. हे ऐकताच सागरने महेशला धारदार शस्त्रने यमसदनी पोहचवल. अखेर पोलिसांनी सागर खरातला बेडय़ा ठोकल्या आहेत.