ताज्या बातम्यादेश-विदेशनाशिकमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीयशेत-शिवार

दाते बांबू नर्सरीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट


नाशिक : बांबूची शेती बहुउपयोगी असून ती शेतकऱ्याला फायदेशीर ठरणारी असल्याने बांबू शेतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शासनसोबत जनतेनेही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.



नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथील दाते बांबू नर्सरीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, तहसीलदार अनिल दौंडे, कार्यक्रमाचे संयोजक आत्माराम दाते, दाते बांबू नर्सरीचे संचालक प्रशांत दाते आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) म्हणाले की, कोरडवाहू नापीक जमिनीवर बांबूचे पीक घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबू शेती (Bamboo farming) करण्यासाठी पुढे यावे. दिवसेंदिवस बांबू चे महत्व वाढत आहे. आज बऱ्याच ठिकाणी प्लास्टीक ग्लास ऐवजी बांबूचा ग्लासचा उपयोग करण्यात येत आहे. पदार्थ बांबूच्या पानापासून अनेक खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. बांबूचे अनेक उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांनी बांबू शेती करुन त्यामध्ये नवनवीन प्रयोग राबवावे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button