ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

चांगलं काम होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात-अजित पवार


पुणे : बारामती शहरात काही झालं तरी पाणी शिरणार नाही अशी व्यवस्था केली आहे. हे करताना थोडा त्रास झाला, काहींची नाराजी ओढवावी लागली.
भाजपचे सरकार असताना पाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फटका आपल्याला बसला. पंरतु आपलं सरकार येताच तो निर्णय बदलला. त्यामुळे आपल्याला परत पाणी मिळाले. चांगलं काम होताना काही लोक मिठाचा खडा टाकतात, असा हल्लोबल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी केलाय. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात कृष्णाली ऍग्रो एजन्सीचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.



अजित पवार म्हणाले, “पालखी मार्ग करताना शेतकऱ्यांना पैसे मिळतात. परंतु, जुने रस्ते रुंदीकरण करताना पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांना या पुढं व्यापारी दृष्टीकोन ठेऊन काम करावं लागणार आहे. कोरोना काळात जीडीपी ढासळला. परंतु, कोरोनाच्या काळात इतरांच्या तुलनेत शेतीचे नुकसान कमी झालं. आता शेती करताना आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे . आदी लोक नोकरीला प्राधान्य देत होते. परंतु, आता कष्ट केले तर शेतीत फायदा होत आहे.

“केंद्र सरकार पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाचे दोन टक्के सरकार भरत होते. पंरतु, आता केंद्र सरकारने हात वर केले आहेत. आता त्याचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. शेतकऱ्यांनी पैसे घेण्याआधी केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं, आम्ही व्याज देणार नाही. आता त्यावर राज्याचे सहकार मंत्री काय भूमिका घेणार हे बघावं लागणार आहे. भाजप सरकारने बंद पाईपलाईनद्वारे पाणी नेण्याचा निर्णय घेतला. वीरच्या वरच्या तीन धरणाचे पाणी वीर धरणात येतं. येत्या चार-पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडेल अस हवामान खात्याने सांगितले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

अजित पवार म्हणाले, “बारामती शहरात अस्थिरीकरण केल्यानंतर बारामतीतील अशोक नगरच्या भागात पणी कमी पडले अशी माहिती मिळत आहे. कॅनॉलमध्ये ज्या ठिकाणी वळणे असतात त्या ठिकाणी पाणी पाजरते म्हणून त्या ठिकाणी लायनींग करायचं होतं. अस्थिरीकरनाच्या मुद्यावर काही बाहेरचे नेते आले आणि नीट माहिती न घेता बोलू लागले. त्यामुळे आता सगळ्या ठिकाणी लायनींगचे काम होणार नाही. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल त्याच ठिकाणी लायनींगचे काम केलं जाईल. 30 वर्षांपासून काम करत आहे. काही लोक वातावरण खराब करत आहेत, त्यांना साथ देऊ नका. लोकांच्या हिताचेच निर्णय घेतले जातील.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button