आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकून पोटच्या तीन मुलांना आईस्क्रीम दिलं

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


आरोपीचा त्याच्या पत्नीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादामुळे त्याने आपल्या पोटच्या तीन मुलांना आईस्क्रीम दिलं आणि त्यापूर्वी या आईस्क्रीममध्ये उंदीर मारण्याचे औषध टाकले होते. या प्रकरणी मुलांची आई नाझियाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी हा फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात इतर अँगलनेही पोलीस तपास करत आहेत.

कुटुंब म्हटलं की वादविवाद आलेच… मात्र, हे वाद विवाद झाल्यावर तुम्ही कशा प्रकारे परिस्थिती हाताळता हे खूप महत्त्वाचं ठरतं.
रागावर नियंत्रण ठेवला नाही तर अनेकदा अशा काही घटना घडतात की ज्याचा नंतर पश्चाताप होतो. आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून अशीच काहीही धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून सर्वांनाच एक धक्का बसला आहे. एका बापाने आपल्या पोटच्या तीन मुलांना विष दिल्याच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे
घटना मुंबईतील मानखुर्द परिसरातील आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, कौटुंबिक वादानंतर एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना उंदीर मारण्याचे औषध दिले. या घटनेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, आरोपी आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते.
आरोपीने आपल्या तीन मुलांना उंदीर मारण्याचे औषध दिले होते. या तीन मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिना आणि अरमान या दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अलिनाचे वय 7 वर्षे आहे आणि अरमान हा केवळ दोन वर्षांचा आहे. तर पाच वर्षीय अलिशान मोहम्मद अली अंसार याचा विषारी औषधामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला आहे.