यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव राहणार
गतवर्षी कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने भर हंगामात दर गगणाला पोहचले होते. कधी नव्हे तो कापसाला तब्बल 14 हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला होता.
शिवाय हा दर कायम वर्षभर टिकूनही राहिला. यंदाही दरात अशीच वाढ राहणार असल्याचे चित्र आहे. देशात निसर्गाच्या लहरीपणामुळे सरासरीच्य क्षेत्रावर देखील कापसाची लागवड झालेली नाही. तर दुसरीकडे कापूस उत्पादक देशांमध्ये दुष्काळजन्य परस्थिती असल्याने उत्पादनात घट निश्चित मानली जातेय. बाजारपेठेतील मागणी आणि आयातीत घट होणार असल्याने यंदाही पांढऱ्या कापसाला सोन्याचा भाव राहणार हे निश्चित. या स्थितीचा सर्वाधिक फायदा भारतामधील शेतकऱ्यांना होणार आहे. कारण हंगामाच्या सुरवातीला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेला असला तरी आता कापूस पीक जोमात आहे.
लागवडही घटली अन् क्षेत्रही
गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याने यंदा लागवड क्षेत्रात वाढ होणार असा अंदाज होता. केवळ विदर्भातच नाहीतर मराठवाड्यात पुन्हा कापूस लागवडी शेतकरी भर देणार असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. पण देशात कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र हे 126 लाख हेक्टर असताना यंदा 124 लाख 50 हजार हेक्टरावर लागवड झाली आहे. दर दुसरीकडे यंदाच्या हंगामात 370 लाख गाठींचे उत्पादन होईल असा अंदाज केंद्रीय कृषी विभागाने व्यक्त केला होता. पण घटत्या क्षेत्राबरोबर कापसाचे उत्पादनही 345 लाख गाठींपर्यंतच जाईल असा अंदाज आहे. घटलेले उत्पादन आणि मागणीत राहणारी वाढ हे भारतीय शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.
अमेरिकेत उत्पादन घटले, फायदा भारतीयांना
भारतामधील काही राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी अमेरिकेत परस्थिती ही वेगळी आहे. अमेरिकेत दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकेत 25 लाख गाठींनी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कापसाची गाठ ही 170 किलोची असते. इतर देशांमध्ये उत्पादन घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होणार आहे. त्याचा फायदा भारतीय व्यापारी आणि शेतकऱ्यांना देखील होणार आहे. बाजारसमित्यांमध्ये आताच कापसाला 10 हजार 300 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.