ताज्या बातम्यादेश-विदेशपुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

मानाच्या पाचव्या ‘ केसरी ‘ गणेशोत्सवाला बुधवारी सुरुवात


लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सकाळपासूनच संचारलेला उत्साह, परंपरेनुसार पालखीत विराजमान झालेला बाप्पा, ‘ श्रीं ‘ चे लोभस रूप डोळ्यांत साठविण्यासाठी रमणबाग चौकात सकाळीच दुतर्फा झालेली भक्तांची गर्दी , ढोल-ताशाच्या गजराने दुमदुमलेला आसमंत , मंगलमय नगारा वादनाने निर्माण झालेला भक्तिभाव , अशा उत्साही , आनंददायी वातावरणात ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा असलेल्या मानाच्या पाचव्या ‘ केसरी ‘ गणेशोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली.
रमणबाग चौकातून सकाळी 10.30 वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे रमणबाग चौकातील महेश गोखले व विध्देश गोखले (गोखले गुरुजी) यांच्याकडून ‘श्रीं’ची मूर्ती घेण्यात आली. पालखीत बाप्पा विराजमान झाल्यानंतर ‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोष भक्‍तांनी केला. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक टिळकवाड्याकडे मार्गस्थ झाली. बाप्पाच्या स्वागतासाठी केळकर रस्त्यावर भक्तांची दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. लाडक्या बाप्पाचे छायाचित्र टिपण्यासाठी तरुणाई गर्दीतून पुढ येत होती.

श्रीराम आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथकांतील वादकांच्या लयबद्ध वादनावर भक्तही ठेका धरत होते. ‘बाप्पा’चे रूप डाळे भरून पाहण्यासाठी भक्त आतुर झाले होते. पालखीत विराजमान झालेले ‘बाप्पा’ दृष्टिपथात पडताच दर्शनासाठी प्रत्येकांचे हात आपोआपच जोडले जात होते.(Pune Kesari Ganeshotsav) ‘केसरी’चे विश्‍वस्त-संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक, विश्‍वस्त-सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्‍वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, ‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, तसेच ‘केसरी’च्या विविध विभागांतील कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

‘केसरी’च्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते श्रीराम व शिवमुद्रा ढोल-ताशा पथकांचे लयबद्ध वादन. पथकांच्या वादनाने गणेशभक्तांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित भक्तांनी पथकातील वादकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. बिडवे बंधूंच्या सनई वादनाने वातावरण अधिक मंगलमय झाले.(Pune Kesari Ganeshotsav) टिळकवाड्याच्या प्रवेशद्वारासह वाड्यातील गणेश मंदिरासमोर साकरण्यात आलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी उत्साह द्विगुणित झाला. ‘श्री’चे टिळवाड्यात आगमन होताच गणेशभक्तांनी ‘बाप्पा मोरया’चा जयघोष केला.

डॉ. प्रणती रोहित टिळक यांनी गणरायाचे औक्षण केले. त्यानंतर ‘श्रीं’ची गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. डॉ. रोहित टिळक, डॉ. प्रणती टिळक यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. टिळक वाड्यातील गणेश मंदिरात प्रतिष्ठापनेच्या वेळी कौस्तूभ खळीकर यांनी पौरोहित्य केले (Pune Kesari Ganeshotsav)सनई वादनाने टिळक वाड्यातील वातावरण मंगलमय झाले होते. बिडवे बंधूंच्या सनई-चौघड्याचे वादन आणि श्रींच्या मंदिरावरील रंगबेरंगी पुष्पांची सजावटीने वातावरण प्रसन्न व मंगलमय झाले होते.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button