योगी आदित्य यांच्या सर्व्हेचे आदेश म्हणजे हे सर्व्हे नसून छोटा एनआरसीच -असदुद्दीन ओवैसी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


उत्तर प्रदेशात मान्यता नसलेल्या मदरशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश योगी सरकारने दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी गंभीर आरोप केला आहे.योगी आदित्य यांच्या सर्व्हेचे आदेश म्हणजे हे सर्व्हे नसून छोटा एनआरसीच असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे. याबाबत ओवैसी यांनी ट्विट करत टीका केली आहे.

“राज्यातील सर्व मदराशे हे घटनेच्या परिच्छेद 30 मध्ये आम्हाला मिळालेल्या घटनात्मक अधिकारात आहेत, असे असतानाही सरकारने हा आदेश का जारी केला? तसेच, हे सर्वेक्षण नसून, एनआरसीच आहे. घटनात्मक अधिकारात सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. मुस्लिमांचा छळ करण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे”, अशा शब्दांत ओवैसी यांनी ट्विट करत योगी सरकारवर टीका केली आहे.
“मदराशांचे इन्फ्रास्ट्रक्चर कसे आहे? मदरशांमध्ये सॅलरी कशाप्रकारे दिली जाते? मदरशांमध्ये या अगोदर केलेले सर्व्हेच्या आधारावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. मदरशांमधील नेमक्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तसेच याची माहिती सरकारला हवी यासाठी हा सर्व्हे करण्यात येणार आहे”, असे दानिश यांनी सांगितेले.