दारूच्या नशेत काय घडल ….

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. अनेकदा हि नशा आपल्या जीवावरसुद्धा बेतू शकते. दारूची नशा कशी जीवघेणी ठरू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच पिंपरी चिंचवडमध्ये घडली

दारू पिण्याच्या सवयीमुळे एका व्यक्तीने आपल्या पाचव्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला (drunk man dies after falling from building). या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पिंपरी शहरातील निगडी परिसरातल्या सेक्टर 22 येथील प्रेरणा सोसायटीच्या अकरा नंबर बिल्डिंगमध्ये घडली आहे.

मृत व्यक्तीचे नाव अनिल कांबळे असे आहे. या व्यक्तीचे वय 50 वर्षे होते. त्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. हा व्यक्ती कापडाच्या मदतीने खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि त्याचा जागीच मृत्यू (drunk man dies after falling from building) झाला. या घटनेचा व्हिडिओ इमारतीखाली उभा असलेल्या लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.