बीड कॉफी सेंटरमध्ये पीडितेवर तीन वेळा बलात्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आले आहे.
मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलिला तोंडाला रुमाल बांधून दोघाजणांनी बळजबरीने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे.
महामार्गालगत असणाऱ्या एका कॉफी सेंटरमध्ये पीडितेवर तीन वेळा बलात्कार केला. या संतापजनक घटनेने गेवराई परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी गेवराई पोलिसांनी तात्काळ नराधम आरोपी रोहित अभिमान आठवले व त्याचा साथीदार सय्यद फरहाण याला अटक केली.

आरोपींविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात, कलम 376 पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.