केज-बीड रस्त्यावरील मस्साजोगजवळील पुलावरून आरामबस कोसळली

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

केज : केज-बीड रस्त्यावरील मस्साजोग जवळील पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळली. ही बस आज द पहाटे पुण्याहून नांदेडकडे जात होती. या अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहेत.
बुधवारी पहाटे ५ च्या दरम्यान पुण्याहून नांदेकडे जाणारी ओम साईराम ट्रॅव्हल्स क्र. (एम एच- ४०/एन-३६६१) केज – बीड रस्त्यावरील मस्साजोगजवळील पुलावरून खाली कोसळली. या अपघातात प्रवास करीत असलेल्या जयश्री जोंधळे, कान्होपात्रा करपेवाड, सीताबाई माळी आणि उषा रानेवाड हे ४ प्रवाशी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार त्रिंबक सोपने, घोलप, महावीर सोनवणे, विलास शेटे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली.