नवरदेवाने अचानक विचार बदलला आणि लग्नकार्यातून धुम ठोकली, नवरीचा पाठलाग

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

लग्नाच्या तयारीत असलेला आणि नटून थटून तयार झालेला नवरदेव (Groom) अचानक तिथून पळ काढत असल्याचं दिसतं.
तर त्याची होणारी नवरी (Bride) ही त्याचा धावा करत आहे आणि आपल्याशी लग्न करावं म्हणून त्याच्या हातापाया पडत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र त्यापैकी बरेचसे व्हिडिओ हे मनोरंजनासाठी तयार केलेले असतात. हा व्हिडिओ मात्र खरा असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही सत्यघटना असून कोर्ट मॅरेजसाठी आलेल्या नवरदेवाने अचानक आपला विचार बदलला आणि लग्नकार्यातून काढता पाय घेत धूम ठोकणंच पसंत केलं.

अशी घडली घटना

हा व्हिडिओ बिहारच्या नवादा जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. इथल्या महुली गावातील राम अवतार चौहानी यांची कन्या गुड्डी कुमारी हिचं लग्न महकार नावाच्या गावातील संदीप कुमार या तरुणाशी होणार होतं. दोघंही एकमेकांशी फोनवरून गप्पा मारत असत आणि एकमेकांशी लग्न करण्याचा विचार त्यानी पक्का केला होता. एक दिवस संदीप कुमार हा गुड्डीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला. त्यावेळी गावातील सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी दोघांचं लग्न लावून द्यायचं नक्की केलं. संदीप कुमार असं अचानक लग्न करायला तयार नव्हता. मात्र गावकऱ्यांचा एकंदरित नूर आणि आक्रमकपणा पाहून त्याने लग्न करायला होकार दिला.