जम्मू : जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव वेगात जाणारी कार थेट दरीत कोसळली.
या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा (Police) ताफा घटनास्थळी दाखल झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, किश्तवाडच्या चिनगाम भागात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. कारवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, सुमो कार ही थेट दरीत कोसळली. या कारमधून ११ प्रवासी प्रवास करीत होते. यामधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.