ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड दोन भरधाव कार एकमेकांसमोर धडकल्या आणि हा भीषण अपघात


गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला बीडमध्ये झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. शिंदे कुटुंबीयांवर या अपघाताने मोठा आघात झालाय.
मृतांची नावे
कोमल शिंदे, महिला पोलीस कर्मचारी
9 वर्षांचं बाळ
जखमींची नावेनवनाथ लटपटे, पोलीस कर्मचारी
इलियास, डॉक्टर

बीड : भीषण अपघातात महिला पोलीस कर्मचारीचा जीव गेलाय.
तर 9 वर्षांचा चिमुरडाही अपघाताचा बळी ठरलाय. दोन भरधाव कार एकमेकांसमोर धडकल्या आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की गाड्या मुख्य रस्ता सोडून शेतात एकमेकांवर आदळल्या. बीडच्या परळी (Beed Accident, Parali) येथे झालेल्या या अपघातातने एकच खळबळ उडाली. यातील महिला कर्मचारी ही आपल्या मुलाला रुग्णालयात घेऊन जात होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. या दोन्ही कार रस्त्याच्या एका खड्ड्यामध्ये एकमेकांवर पडलेल्या स्थितीत आढळून आल्यात. या अपघातातील मृत पोलीस कर्मचारी महिला (Komal Shinde) ही बीड जिल्ह्यातील दिंद्रूड इथं कामाला होती.

या अपघातातील मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव कोमल शिंदे आहेत. त्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जायला निघाल्या होत्या. त्या दरम्यानच काळाने या दोघांवरही घाला घातला. दरम्यान, दुसऱ्या कारमध्ये असलेल्या डॉक्टर इलियास यांनाही अपघातात जखम झाली. त्यांच्यासह इतर दोघे जण कारच्या भीषण अपघातामध्ये जखमी झाले. या जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button