क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली


जळगाव शहरातील मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये लागलेली शर्यत एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली आहे. कारने दिलेला धडकेत सायकलस्वार चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
विक्रांत संतोष मिश्रा (वय, 11 रा. एकनाथ नगर, मेहरून ट्रॅक जवळ ) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. हा अपघात एवढा जोरदार होता की या घटनेत कारच्या धडकेनंतर चिमुकला चेंडू सारखा हवेत उडाला. त्यातच त्याचा गाजीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणाऱ्या कारमधील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विक्रांत मिश्रा हा वडील संतोष गिरीजाशंकर मिश्रा, आई रिचा यांच्यासोबत जळगावात राहत होता. विक्रांत हा मेहरूण जलतरण तलावसमोरील विद्या इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत होता. आज रविवार असल्याने विक्रांतला शाळेत सुट्टी होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरापासून जवळ असलेल्या मेहरूण ट्रॅकवर त्याच्या काकाचा मुलगा सुनिल जितेंद्र मिश्रा याच्यासोबत गेला होता. यावेळी मेहरूण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस लागली होती. या रेसमधील एका कारने ( क्रमांक , एमएच 19 बीयू 6006) विक्रांतला जोरदार धडक दिली. या धडकेत विक्रांत जागीच ठार झाला. कारच्या धडकेनंतर चिमुकला चालवत असलेली सायकल झाडावर अडकली होती.

दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारने धडक दिल्यानंतर विक्रांत चेडूंसारखा 12 ते 15 फूटवर उडाला होता. त्याची सायकल झाडावर अडकली होती. घटना घडल्यानंतर जवळच्या नागरिकांनी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषीत केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button