बोधेगाव येथे बन्नोमाँ दर्ग्याशेजारील पुरोहित स्विट मार्ट, बन्नोमाँ हॉटेल आणि साईराज हेअर ड्रेसर्स या तीन दुकानांना आग

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगत बन्नोमाँ दर्ग्याशेजारील पुरोहित स्विट मार्ट, बन्नोमाँ हॉटेल आणि साईराज हेअर ड्रेसर्स या तीन दुकानांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली.

यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील तरूणानी प्रयत्नांची पराकाष्टा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे दीड तासाने गंगामाई साखर कारखान्याची अग्निशामक गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली. गुरुवारी बोधेगावचा आठवडे बाजार होता. पोळा सणामुळे बाजारात गर्दी असल्याने रात्री उशिरापर्यंत सर्वच दुकाने सुरू होती.
गावातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. टँकर पाण्याने भरून आणून तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दीड तासाने गंगामाई साखर कारखान्याची अग्निशमन गाडी आल्यावर आग आटोक्यात आली. या आगीत बन्नोमाँ हॉटेलचे सुमारे दोन लाखांचे, पुरोहित स्विट होमचे 9 लाखांचे नुकसान झाले. तर, कृष्णा खंडागळे यांचे साईराज हेअर ड्रेसर्स हे दुकान पूर्ण जळून खाक झाले.
आग विझविण्यासाठी दीपक गायकवाड, केदारेश्वरचे संचालक मयूर हुंडेकरी, माजी संचालक अनिल कांबळे यांच्यासह अनेक तरुणांनी मदत केली. माजी जि.प. सदस्य नितीन काकडे, माजी सरपंच राम अंधारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे टँकर, जेसीबी तातडीने उपलब्ध करून बचाव कार्यात मदत केली.