ताज्या बातम्यादिल्लीदेश-विदेशमहत्वाचे

कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेला नाॅयडामधील सुपरटेक ट्विन टाॅवर पडणार


इमारत ज्या दिशेने पाडायची आहे त्यानुसार स्फोटके बसवण्यात आली आहेत. सायन टॉवर आधी पडेल, त्यानंतर काही सेकंदांनी एपेक्स टॉवर पडताना दिसेल. सुमारे १७ मिलीसेकंद ते २०० मिलीसेकंदच्या अंतराने स्फोट होतील. सर्व गनपावडरचा स्फोट होण्यासाठी 9 सेकंद आणि इमारत खाली पडण्यासाठी चार सेकंद लागतील. एकूण, १२ते १३ सेकंदात, ही इमारत पूर्णपणे खाली पडेल.



कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेला नाॅयडामधील सुपरटेक ट्विन टाॅवर २८ऑगस्टला पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे पाडला जाणार आहे. इतकी माेठी इमारत पाडणे ही दिल्लीतील एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे.
इमारत पाडण्यापासून ते सुरक्षा आणि परिसरातील वाहतूक वळवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट २०२१ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नोएडा ट्विन टॉवर्स, सेक्टर ९३ ए हे नोएडातील भारतातील सर्वात उंच बांधकाम बेकायदेशीर घोषित केले. सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर्सच्या बांधकामात नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य केले. सुप्रीम कोर्टाच्या बेकायदेशीर ठरवण्याच्या आदेशानंतर तीन महिन्यांनी हा ट्विन टॉवर पाडण्यात येणार होता. आता वर्षभरानंतर २८ ऑगस्टला म्हणजे रविवारी दुपारी २.३० वाजता हा ४० मजली बेकायदेशीरपणे बांधलेला ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे.

ट्विन टॉवर्स खाली आणण्यासाठी ३५०० किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर केला जाईल. रविवारी शहराच्या दिशेने ट्विन टॉवर्सभोवती एक किलोमीटरचे सर्कल तयार करून मोठ्या संख्येने पोलीस कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार आहेत.ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूला बांधलेल्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना प्रवेशही दिला जाणार नाही. टाॅवरमध्ये स्फाेट घडवण्याच्या ममधी एमरल्ड काेर्टमधल्या दाेन इमारतीमधील लाेकांना सकाळी आपले घर खाली करावे लागेल. स्फाेटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते परतू शकतील.

ट्विन टॉवर पाडताना आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या छतावर आणि बाल्कनीत जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर ३१ ऑगस्टपर्यंत ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला असून, त्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button