कुळाच्या नोंदी कमी केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार हेळकर यांची महसुल अधिकाऱ्याकडुन पाठराखण !

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


कुळाच्या नोंदी कमी केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार हेळकर यांची महसुल अधिकाऱ्याकडुन पाठराखण !

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मुख्यमंत्र्याकडे कारवाईची मागणी

परंडा : ( सुरेश बागडे ) परंड्याचे तत्कालीन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सातबारा उताऱ्यावर मागील अनेक वर्षापासूनची असलेल्या कुळाच्या नोंदी कमी केल्याचे माहिती अधिकारात समोर आले असुन . या प्रकरणी कारवाईची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवेदनाद्वारे केली आहे .
विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे सहा माहिण्याआधी याबाबत निवेदन दिले होते परंतु महसुल अधिकाऱ्याकंडुन तत्कालीन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची पाठराखण केली जात आहे असा अरोप करण्यात आला आहे .
याप्रकरणी कांहीच कारवाई होत नसल्याने माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने गुरूवार दि २१ जूलै रोजी मुख्यमंत्र्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आहे येत्या १० ऑगस्ट २०२२ पर्यंत कारवाई झाली नाही तर परंडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा यात देण्यात आला आहे .
तत्कालीन तहसीलदार होळकर यांनी सातबारा उताऱ्यावरून कुळाच्या नोंदी नियमबाह्य पणे कमी केले असून याप्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केला आहे . हेळकर यांनी १४ ऑगस्ट २०१७ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तहसीलदार पदावर कार्यरत असताना त्यांनी हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानान्वे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेल्या कुळाच्या अनेक नोंदी नियमबाह्यपणे कमी केल्या आहेत .या प्रकरणात निर्णय घेताना अनिमित्त झालेली आहे काही प्रकरणात कुळधारकांना नोटीसा मिळाल्या नाहीत अनेक प्रकरणांमध्ये शेतमालकाकडून आर्थिक देवाण घेऊन करून त्यांचे हित जोपासले आहे . अनेक प्रकरणात कागदपत्रावर खाडाखोड झाल्याचे दिसून येत आहे हा प्रकार माहिती आधिकारात मिळालेल्या माहित समोर आले आहे . याप्रकरणी चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केली आहे . या मागणीवर तालुकाध्यक्ष फारूक शेख , नवनाथ कसबे , विजय मेहर , नवनाथ साठे, अमित आगरकर, जमीर सिकलकर, असलम पल्ला, किशोर येवारे , आबा कोकाटे, राहुल बनसोडे, मुस्तकीम शेख, धनंजय गोफने ,निहाल सिकलकर, सिकंदर पठाण, ताहेर शेख, जावेद शेख ,अज्जू पठाण, यांनी केले आहे