सोनाली यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


भाजप नेता आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांचा मंगळवारी गोव्यात मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पण, सोनाली यांच्या भावाने त्यांचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप केला आहे.
एशियानेट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी गोवा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोनाली यांच्या सहकाऱ्यांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. सोनाली यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सहकारी सुखविंदर यांच्यावर सोनाली यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीनुसार, सोनाली यांचा पीए झाल्यानंतर सुधीर याने सर्व कारभार हातात घेतला होता. त्या देखील सुधीरवर विश्वास ठेवू लागल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी सुधीरने सोनाली यांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून त्यांच्यावर बलात्कार केला होता. त्या बलात्काराचा व्हिडीओ बनवून त्याने सोनाली यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. या व्हिडीओच्या आधारे सुधीर याने सोनाली यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता. सुधीर याने कामाला लागल्यानंतर आधीच्या नोकरांना हटवून सोनाली यांच्यासाठी नवीन नोकर नियुक्त केले होते. त्यांच्याकरवी त्याने सोनाली यांच्या घरात चोरी देखील करवली होती, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

सुधीरच सोनाली यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत असे. त्यामुळे त्याने त्यांना हळूहळू विष द्यायला सुरुवात केली. मृत्युपूर्वी सोनाली यांनी रिंकू यांना फोनवर सुधीर याने खीर खायला दिल्याचं म्हटलं होतं. ती खाल्ल्यानंतर त्यांचे हातपाय थरथरू लागले आणि अस्वस्थ वाटू लागल्याचंही त्या फोनवर म्हणाल्या होत्या. हिसारला परतल्यानंतर पोलिसांना याबाबत सांगून सुधीरला कठोर शिक्षा देणार असा निश्चयही त्यांनी केल्याची माहिती या तक्रारीत रिंकू यांनी दिली आहे.