दहीहंडेमध्ये नाचत असताना तरुणावर गोळीबार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : दहीहंडेमध्ये नातच असताना एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. ही घटना वडगाव धायरी (Pune Crime News ) इथं घडली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दहीहंडीत (Pune Dahi handi) गाण्यांच्या तालावर नाचत असताना पूर्वीच्या भांडणाच्या राहातून टोळण्यात एका तरुणावर वार करत हवेत गोळीबार (Firing in Wadgaon Dhayari) केला होता. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. वेताळ मित्र मंडळाकडून दहीहंडी साजरी केली जात होती. त्यावेळी हा प्रकार घडल्यानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु होतं. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून गोळीबार करणाऱ्या तरुणाची ओळखही पटली आहे. तसंच या घटनेत एक तरुण जखमी झाला होता.

आधी मारहाण आणि मग गोळीबार
शुभम जयराजय मोरे हा महादेव नगर, वडगाव धायरी इथं राहायला आहे. तो दहीहंडीत गाण्यांच्या तालावर नाचत होता. यावेळी शुभमवर टोळक्याने वार केला, त्याला मारहाण केली आणि हवेत गोळीबारही करण्यात आला. या घटनेत शुभम मोरे हा तरुण जखमी झाला होता. हवेत गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणाची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी लगेचच गंभीर दखल घेत पुढील तपास सुरु केला. प्राथमिक तपासात ओंकार लोहकरे या तरुणाने हवेत गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे.