ताज्या बातम्यामहत्वाचे

गोविंदा पथकाच्या ट्रकचा भीषण अपघात


देशभरात दहीहंडी उत्सव हर्षोल्हासात साजरा होत असतानाच Govinda team truck accident in thane भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील कालिका माता Kalika Mata Govinda team truck accident गोविंदा पथकाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला
गोविंदा पथकातील अर्धा डजनहून अधिक गोविंदा या घटनेत जखमी झाले आहेत.ठाणे : देशभरात दहीहंडी उत्सव हर्षोल्हासात साजरा होत असतानाच भिवंडी Govinda team truck accident in thane तालुक्यातील खारबाव गावातील कालिका माता गोविंदा पथकाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला. गोविंदा पथकातील अर्धा डजनहून अधिक गोविंदा Kalika Mata Govinda team truck accident या घटनेत जखमी झाले आहेत. यामध्ये एक गोविंदाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील कालिका माता गोविंदा पथक ट्रकने शहरातील दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यास शुक्रवारी दुपारच्या सुमारास निघाला होता. मात्र ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याचा भिवंडी तालुक्यातील कालवार गावाच्या हद्दीत ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात होऊन तो दुभाजकावर आदळला. या अपघातात ७ ते ८ गोविंदा जखमी झाले असून, अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी भिवंडीतील अंजूर फाटा येथील रेनबो या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारानंतर किरकोळ जखमी गोविंदांना घरी सोडण्यात आले. मात्र, अगस्ती रंगनाथ पाटील नावाच्या गोविदाचे तातडीने ऑपरेशन करणे गरजेचे असे डॉक्टरने सांगितल्याने त्याला ठाण्यातील स्पेक्ट्रम या खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. त्याच्या उपचारासाठी खारबाव गावासह पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून वर्गणी जमा करण्यात येत असून आर्थिक मदतीसाठी स्थानिक पुढाऱ्यांकडेही मागणी केली जात आहे. मात्र लाखोंची दहीहंडी उभारून बक्षिसे लयलूट करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे, वर्गणी गोळा करून सध्या तरी गंभीर अवस्थेत असलेल्या गोविंदावर नातेवाईक उपचार करीत आहेत. या घटनेची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button