ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत


लोणावळा: पुणे मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील नागनाथ ते पळसदरी दरम्यान पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याने पुणे मुंबई रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा व विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.
तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.दरड कोसळल्याची माहिती समजल्यानंतर रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी आशा आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button