क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

डालडा मिश्रीत भेसळयुक्त तूपाच्या कारखान्यावर छापा


पुणे : राखीपोर्णिमेच्या पुर्वी भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज भागातील एका डालडा मिश्रीत भेसळयुक्त तूपाच्या कारखान्यावर छापा कारवाई करत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून तब्बल १५० लीटर बनावट भेसळयुक्त तुप पकडले आहे. तूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले असून, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन याचा तपास करत आहेत.



मोहींदर सिंग (वय ३०) असे अटक पकडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कात्रज आंबेगाव परिसरात बनावट तूप बनविणार कारखाना सुरू असल्याची माहिती पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने याठिकाणी छापा टाकला. तसेच, या ठिकाणाहून १५० लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले. डालडा व जेमिनी तेल मिक्स करून तो भेसळयुक्त तुप तयार करत असल्याचे उघडकीस आले. याबाबत आता अन्न व औषध विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून येथे भेसळयुक्त तूप बनवित असल्याचेही समोर आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button