क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

सुनेचे मुंडके कापले, मुंडके हातात घेून ती रस्त्याने चालत थेट पोलीस स्टेशनला


अन्नामैय्या जिल्ह्यातील रायचोटी भागात सुब्बम्मा नावाची महिलेने आपल्या ३५ वर्षीय सून वसुंधरा हिचे मुंडके कापले. तिचे मुंडके कापल्यानंतर तिने ते एका पॉलिथिन बॅगमध्ये भरले आणि ही पॉलिथिनची पिशवी हातात घेऊन ती रस्त्याने पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागली. रस्त्यावरुन तिला या अवस्थेत जाताना पाहून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. शहरातील लोकांमध्ये धास्ती पसरली. अनेक जण ते दृश्य पाहूनच घाबरले. हातात मुंडके घेऊन ही महिला पोलीस ठाण्यात पोहचली, तेव्हा ते पाहून पोलीसही हैराण झाले.कोणत्या कारणाने केली सुनेची हत्या?
रायचोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर यांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुब्बम्मा, सून वसुंधरा हिचे कापलेले मुंडके घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. सुब्बम्मा यांचा मुलाचा १० वर्षांपूर्वी वसुंधराशी लग्न झाल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर वसुंधरा आणि सुब्बम्मा या एकत्रित राहत होत्या. वसुंधरा हिचे मल्लिकार्जुन नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुब्बम्मा यांना होता. संपत्तीसाठी वसुंधरा आणि मल्लिकार्जुन हे सुब्बम्मा यांना ठार मारण्याची योजना आखत असल्याचा संशयही सुब्बम्मा यांना होता. याच संशयातून सुब्बम्मा यांनी वसुंधरा हिची एवढ्या क्रूरपणे हत्या केली.

सासूने स्वत:चे भविष्यही संपवले
वसुंधराचे मुंडके उडवून सुब्बम्मा थांबल्या नाहीत, तर त्यांनी ते मुंडे घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठत, गुन्ह्याची कबुलीही दिली. या प्रकाराने या शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुब्ब्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेत तिला अटक केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button