लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपची मते 50 टक्क्यांपर्यंत घसरू शकतात

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. ज्या पद्धतीने या बंडखोरांनी सत्ता बळकावली ते राज्यातील बहुसंख्य लोकांना आवडलेलं नाही.
सत्ताबदलानंतर जर आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा प्रश्न विचारला जात होता. या प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शिंदे गट आणि भाजप एकत्र येऊनही 18 जागांच्या पलिकडे जाऊ शकणार नाही असं इंडिया टीव्ही आणि सी व्होटर्स या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रांच्या अडचणी वाढतच चालल्याचं दिसून आलं आहे.

इंडिया टीव्ही आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणातून दिसून आलंय की राज्यात बनलेलं एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं सरकार लोकांना आवडलेलं नाहीये. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने 48 पैकी 42 जागा जिंकल्या होत्या. मात्र आज भाजप, शिंदे गटासोबत लोकसभा निवडणुकीला सामोरी गेली तर त्यांना फक्त 18 जागांवरच समाधान मानावं लागेल असं या सर्वेक्षणातून दिसून आलं आहे. आजघडीला निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी जबरदस्त मुसंडी मारताना पाहायला मिळू शकते. आजघडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजपची मते 50 टक्क्यांपर्यंत घसरू शकतात असे या सर्वेक्षणातून दिसून आलंय.