क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

उमापूर गावात,झाडावर लटकलेला मृतदेह पती अटक सासू-सासरे फरार


“माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिची हत्याच झाली आहे. तिला तिच्या घरी मारण्यात आलं. मग तिला घराजवळच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकवण्यात आलं. जेणे करून कुणालाही शंका येऊ नये की तिची हत्या झालीय म्हणून. पण जेव्हा तिला पाहिलं तेव्हाच मनात शंका आली की कदाचित काही घातपात झालाय. तिला ज्या झाडावर लटकलेलं पाहिलं तेव्हा वाटलं एवढ्या मोठ्या झाडावर ती कशी चढली असेल, जर ती चालून शेतात गेली तर तिच्या पायाला माती, चिखल लागायला पाहिजे होता, पण तसं काहीच नव्हतं. तेव्हाच वाटून गेलं की तिला मारण्यात आलंय…”, असं बन्सी पवार यांनी सांगितलं.बीड : “तिचा वारंवार छळ व्हायचा… लग्न झालं तेव्हापासूनच घरात धुसपूस सुरू होती. नवरा शेतात काम करतो. तो दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा.
बीड : “तिचा वारंवार छळ व्हायचा… लग्न झालं तेव्हापासूनच घरात धुसपूस सुरू होती. नवरा शेतात काम करतो. तो दारू पिऊन तो तिला मारहाण (Beating) करायचा.

अनेकदा तिने आमच्याजवळ बोलूनही दाखवलं. पण ‘संसार’ करायच्या नावाखाली ती पुन्हा तिच्या कामांमध्ये व्यस्त व्हायची. आधी तिला खूप एकटं वाटायचं. पण मग तिला दोन मुलं झाली अन् या सगळ्यात आयुष्यातील 7-8 वर्षे कधी निघून गेली कधी कळालंच नाही. या काळात तिला दोन मुलं झाली. मग कितीही भांडणं झाली, मारहाण झाली तरी ती मुलांकडे बघून पुन्हा उभी राहायची. मुलांसाठी आमि मुलांकडे बघून ती त्या घरात राहत होती. पण इतके दिवस सुरु असलेल्या अत्याचाराचं टोक त्यादिवशी गाठलं गेलं. सकाळपासूनच घरात भांडणं सुरु होती. आपण वेगळं राहुयात, असं तिनं आणि तिच्या नवऱ्यानं ठरवलं. मग दुपारी चार वाजता ती आमच्या नातेवाईकांशी बोलली होती. पण पुढच्या तासाभरात आम्हाला फोन आला. तिने आत्महत्या केली… पण हे कसं शक्य आहे. तिने काहीवेळा आधी फोन केला, तेव्हा तसं काहीच जाणवलं नाही. तसं तिला काही वाटत असतं तर ती बोलली असती, रडली असती… पण तसं काहीच झालं नाही. पण मग अवघ्या तास दिड तासात असं काय झालं? तिने आत्महत्या का केली? कश्यासाठी केली? हे सगळं कसं घडलं? हे सगळे प्रश्न आम्हाला सतावताहेत. पण तिने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झालीये”, असं अंजना राठोडचे (Anajna Rathod) वडिल बन्सी पेमा पवार (Bansi Pawar) यांनी त्या घटनेची पार्श्वभूमी सांगितली.

बीडच्या गेवराई तालुक्यात घडलेल्या घटनेने परिसर हळहळला आहे. गेवराईतील उमापूर गावात ठाकरी तांड्यावर अंजना सुनील राठोड यांचा झाडावर लटकलेला मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केल्याचं सासरी मंडळी सांगत आहेत. मात्र अंजना यांची हत्या झाल्याचा आरोप माहेरचे लोक करत आहेत. या प्रकरणी चकलांबा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली. कलम 302, 498, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. यात अंजना यांचे पती सुनिल राठोड यांना अटक करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button