क्राईमताज्या बातम्यानागपूरमहत्वाचेमहाराष्ट्र

आई-वडिलांची कमाल मुलीला भूतबाधा,जबर मारहाण, सहा वर्षीय मुलीचा मृत्यू


नागपूर : नागपुरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण
त्यात सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. नागपूरच्या सुभाष नगर (Nagpur Subhash Nagar) परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था, सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव लक्षात घेऊन तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांना शंका होती. एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले होते. मात्र त्याचा काहीच फायदा होत नव्हता. शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली.
चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र उपचारा पूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता. आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचे मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला.आईवडिलांनी पळ काढल्यानंतर रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचे मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली.

मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले त्या गाडीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला आहे.याप्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर या प्रकरणाला पुढील तपास करत असून नागपुरात घडलेल्या घटनेनं संपात व्यक्त केला जातोय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button