ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

बीड पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेलावर नागरिकांनी मारला डल्ला


बीड: बीड अहमदनगर (Beed) महामार्गावरील खाद्यतेलाचा (Edible Oil) टॅंकर पलटी झाला आहे.पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेलावर नागरिकांनी डल्ला मारलाय. हे तेल नेण्यासाठी, नागरिकांनी गर्दी करत मिळेल तसे तेल लुटले आहे
प्राप्त माहितीनुसार, अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात अहमदनगरहून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला. रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने टँकर पलटी झाला आणि चालक बेशुद्ध पडला. टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून खाद्यतेलाचा गळत होते. दरम्यान, टॅंकर उलटल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ड्रम, हांडे, डब्बे घेऊन खाद्यतेलाचा मिळेल तसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती. दरम्यान रात्री उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button