ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना मारहाण,पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल


जामखेड : हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना जामखेड तालुक्यातील मोहरी या ठिकाणी पहाटे मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच महारांजांनकडील आसलेले 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या आहे.
त्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.



याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे 29 रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी येथील घुगेवस्ती येथे सुरू असलेल्या महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी आले होते. त्याच दिवशी मोहरी येथील बाजीराव गिते यांच्या घरामध्ये पहाटे दीड ते साडेपाच या वेळेत त्यांना मारहाण करण्यात आली.

याबाबत खर्डा पोलिस स्टेशनला बुवासाहेब खाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, जखमी फिर्यादी हे महादेव मंदीराचे काम पाहण्यासाठी घुगेवस्ती, मोहरी येथे गेले असता त्य़ाठिकाणी बाजीराव गिते, भिवा गोपाळघरे, अरूण गिते, राहूल संपत गिते रामा गिते यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना बाजीराव गिते याच्या घरामध्ये बोलावून घेवून आरोपी राहूल संपत गिते याने मोबाईल मधील फोटो दाखवून शिवीगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या दोन्ही कानशिलात हाताने मारहाण केली.

त्यावेळी फिर्यादी हे खाली पडले असता इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी राहूल संपत गिते हा हातामध्ये सुताची दोरी घेवून फिर्यादीचे तोंडा भोवती फिरवून म्हणाला तुला फाशी देईल अशी धमकी दिली आहे. त्यानंतर पहाटे 05.30 वा राहुल गिते हा हातामध्ये कोयता घेवून व बाजीराव गिते हा लोखंडे पेरे घेवून फिर्यादीचे पुढे येवून तुझ्या अंगावरील सोने काढून दे नाहीतर तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून टाकू अशी धमकी देत फिर्यादीच्या ताब्यातील 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी बुवासाहेब खाडे महाराज जखमी असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हाँस्पिटलमधून जखमी बुवासाहेब खाडे महाराज यांचा जबाब प्राप्त झाल्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी रात्री उशिरा खर्डा पोलिस स्टेशनला मोहरी गावातील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button