ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

पांडवांनी प्राचिनकाळात याच मार्गाने चारधाम यात्रा केली होती


आयुष्यात एकदा तरी चारधामची यात्रा केली पाहिजे असे अनेकजण म्हणत असतात. चारधामची पवित्र मंदिरे आणि तेथील निसर्ग अनुभवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. उत्तराखंडमधील गढवालच्या हिमालयांच्या रांगांमध्ये असलेले यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ ही सर्व पवित्र स्थळे म्हणजेच चारधाम.
दरवर्षी हजारो भाविक ही चारधाम यात्रा करत असतात. पांडवांनी पण प्राचिनकाळात याच मार्गाने चारधाम यात्रा केली होती असे म्हटले जाते. साधारण ३,००० वर्षांपूर्वीचा हा जुना मार्ग एका २५ जणांच्या ट्रेकर्सने पुन्हा शोधून काढला. हा प्राचिन मार्ग उत्तराखंड सरकार लवकरच जनतेसाठी खुला करणार आहे.
साधारणपणे १९४० पर्यंत हा मार्ग ज्ञात होता त्यावेळी भाविक हरिद्वारपासून यात्रा सुरू करायचे आणि १४ दिवसांमध्ये या चारधाम तीर्थस्थानांचा प्रवास पूर्ण करायचे. कालांतराने येथे वाहन जाण्यायोग्य रस्ते बांधले गेल्यानंतर हा मार्ग सोडून देण्यात आला. परंतु साधारण आठ महिन्यांपूर्वी ट्रेकिंग तज्ज्ञ, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या २५ जणांच्या चमूने या जुन्या रस्त्याचा शोध सुरू केला. या पथकाने ऋषिकेश येथून आपला प्रवास सुरू केला. या प्रवासात गढवालच्या टेकड्यांमधील सर्वात कठिण समजले जाणारे २४ विविध भूभाग त्यांनी पार केले. या चमुने १,१५६ किलोमीटरचे अंतर कापत या जुन्या मार्गाने आपली चारधामची यात्रा पूर्ण केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button