ताज्या बातम्या

बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर(MPJ) यांची एक महत्वपूर्ण बैठक


बिड जिल्ह्यातील माजलगांव येथे मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर(MPJ) यांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (MPJ) तालुका अध्यक्ष पदी इरफान मिर्झा, व शहर अध्यक्ष पदी ज़मिर शेख यांची निवड करण्यात आली.

सय्याद साबाहत अली सर (जिल्हा अध्यक्ष MPJ बीड )यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली व सबाहत अली सर यांनी संघटनेचा परिचय देताना सांगितले की ” मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (MPJ)
रेशन, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात लोकांना नेतृत्व करण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी योजनांचा (योजना) लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करते. आरोग्य आणि शिक्षणासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळेच या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे.
योग्य ज्ञान आणि मार्गदर्शनाअभावी अनेक सरकारी योजनांपासूनही लोक वंचित राहतात. मानव सेवा आणि देश सेवेस समर्पित संघटन आहे. समाजातील शोषित, पीडित,अनाथ मुले, विधवा स्त्रिया या सर्वच घटकाबरोबर आमचे संघटन मजबुतीने उभे राहील त्यांना त्यांचे हक्क मिळवून देऊ

आज समाजाला, देशाला चारित्र्यवान, कणखर, समर्पित युवकांची गरज आहे. त्यामुळे युवकांनी आपले शिक्षण, आपले काम करत-करत मानव सेवा आणि देश सेवा सुद्धा केली पाहिजे, महापुरुषांचे विचार आमलात आणले पाहिजे आणि त्यांचा प्रचार-प्रसार सुद्धा केला पाहिजे.
मूवमेंट फॉर पीस अँड जस्टिस (MPJ) हे संघटन महाराष्ट्रात युवकांमध्ये स्वाभिमान जागे करण्यासाठी, जागृती करण्यासाठी प्रयत्नशील आहे व या वेळी धारुर चे MPJ चे तालुका अध्यक्ष आतीक मोमीन याणी मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळीस उपस्थित पाहुन्या मध्ये समाज सेवक शेख़ शौकत, पत्रकार मुस्ताक कुरैशी,शाहेद भाई, अजहर शेख, मोहसिन मिर्झा, उमेश जाधव, हमीद मिर्झा, वसीम मिर्झा,सलीम शेख, अलताफ़ मिर्झा हबीब भाई व या कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरिक,विद्यार्थी, व जकी बाबा मित्र मंडळ चे युवक हे सुद्धा उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

शेख शौकत (MPJ जिल्हा सदस्य बीड)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button