श्रावणी सोमवार पूजा विधी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासातील श्रावण हा महिना पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ मिळतं.

तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारचं व्रत करणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार, पार्वतीन या महिन्यात कठोर व्रत करून भगवान शंकराना प्राप्त केलं होतं.

या कारणामुळे हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. शनिदेव हे भगवान शंकराचे आवडते शिष्य असल्याने या दिवशी केलेल्या व्रताने शनिदेवही प्रस्न होतात. त्यासोबत चंद्रदोष, ग्रहणदोष किंवा सर्पदोशातून मुक्ती होते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी आहे. योगायोगाने या दिवशी विनायकी चतुर्थी देखील आहे.

श्रावणी सोमवार पूजा विधी

सकाळी लवकर उठून स्नान करावे धूप, दिवा लावून श्री गणेशाची आरती करावी
त्यानंतर मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करावा
पंचामृताने रुद्राभिषेक करुन बेलपत्र अर्पण करावेशिवमूठ तांदूळ असल्याने शिवलिंगावर अर्पण करावे
शिवलिलामृतातील 11 वा अध्याय वाचावा
शंकराची आरती करून प्रसाद घ्या
संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडावा
ही काळजी घ्याल

महादेवाची पूजा करता चुकूनही शिवलिंगावर तुळस अर्पण करू नका. तसेच केतकीच्या फुलांचा वापर करू नका यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात, असं धार्मिक मान्यता आहे. तसेच शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करू नये.