ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

सापाने व्यक्तीच्या ‘लैंगिक भागा’वर चावा घेतला अन आयुष्यभरासाठी त्यांच्या मनात टॉयलेट मध्ये जाण्याची भीती बसली


ऑस्ट्रेलिया मध्ये 65 वर्षीय व्यक्तीला शेजारांनी पाळलेला पायथन अर्थात सापामुळे आयुष्यात भयानक अनुभव मिळाला आहे. या सापाने वृद्ध व्यक्तीच्या ‘लैंगिक भागा’वर चावा घेतल्याची बाब समोर आली आहे.Daily Mail च्या रिपोर्ट्सनुसार, सोमवारी सकाळी 6 वाजता ही व्यक्ती वॉशरूममध्ये गेली होती. तेव्हा त्यांना गुप्तांगावर काहीतरी चावल्यासारखं झालं. काही वेळातच तो जमिनीवर बसला. जेव्हा त्यांनी खाली बघितलं तेव्हा 5 फूटी साप पाहून आवाक झाले.

नशिबाने साप विषारी नसल्याने हा प्रकार जीवावर बेतला नाही पण लहानशा जखमा झाल्या. पण आता आयुष्यभरासाठी त्यांच्या मनात टॉयलेट मध्ये जाण्याची भीती बसली आहे.
साप हा या वृद्ध व्यक्तीच्या शेजारी राहणार्‍या 24 वर्षीय मुलाने पाळला आहे. तो नजर चुकवून त्यांच्या घरातून बाहेर पडला. पोलिसांच्या अंदाजानुसार, तो ड्रेन्समधून गेला असावा.

सापाची सुटका करण्यासाठी स्थानिक reptile expert ची मदत घेण्यात आली. आता 24 वर्षीय व्यक्तीवर अनावधानातून हल्ला झाल्याच्या प्रकरणामध्ये चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. पोलिसांनी या तरूणाकडे 11 बिनविषारी साप आणि gecko अर्थात छोटी पाल असल्याचं सांगण्यात आलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button