शरद पवार कुणावर खुश झाले तर पुढे त्याचा कार्यक्रमच होतो

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


मुंबई : असं म्हणलं जाते की, शरद पावर बोलतात त्याच्या विरुध्द करतात. अनेक वेळा शरद पवार कुणावर खुश झाले तर पुढे त्याचा कार्यक्रमच होतो.

संजय राऊतांवर ईडी कडून कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेताच मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे संजय राऊतांवर ईडी च्या कारवाईवरुन (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदी यांना भेटले होते. आता त्यांच्या भेटीनंतरच ही कारवाई झाल्याचे सांगत हीच खरी पवारनिती असल्याचे काळे यांनी ट्विट केले आहे. राऊतांवरील कारवाईनंतर शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले आहेत तर मनसेच्या गोठातून अशाप्रकारे खिल्ली उडवली जात आहे. काळे यांच्या एका ट्विटने शरद पवार आणि संजय राऊत या दोघांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.