ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मुदतीत प्राप्तीकर रिटर्न भरले नाही, तर अशा करदात्यांवर कारवाई होऊ शकते. तुरुंगवासही होऊ शकतो.


31 जुलै ही प्राप्तिकर रिटर्न (ITR Filling) भरण्याची निर्धारीत अंतिम मुदत आहे. तांत्रिकदृष्ट्या, आज आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत (Last Date) आहे



मुदतीत प्राप्तीकर रिटर्न भरले नाही, तर अशा करदात्यांवर कारवाई होऊ शकते. तुरुंगवासही होऊ शकतो. पण त्यासाठी तरतुदी आहेत. जेव्हा तुम्हाला ईमेलवर किंवा फोन मेसेजमध्ये आगाऊ नोटीस पाठवली जाते. तरीही तुम्ही अंतिम मुदतीचे पालन करून ITR भरत नाही, तेव्हा करदात्याला तुरुंगाची हवा खावी लागते. कर अधिकाऱ्याला वाटत असेल की तुम्ही रिटर्न मुद्दाम भरले नाही, तर तो तुमच्याविरुद्ध खटला चालवू शकतो. कायद्यातील तरतुदीनुसार, तुरुंगवासाची शिक्षा 3 महिने ते 2 वर्षांपर्यंत असू शकते, तसेच नुकसान भरपाई ही भरावी लागेल. जर कर दायित्व जास्त असेल, तर तुरुंगवासाची शिक्षा 7 वर्षांपर्यंत असू शकते.

दंड भरावा लागेल
अनेक वेळा लोक त्यांच्या कर दायित्वाबद्दल कमी माहिती देतात. चुकीची कर अहवाल माहिती दिल्याबद्दल तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल. दंडाची रक्कम तुमच्या कराच्या 50 टक्क्यांपर्यंत असू शकते. कर विभागाच्या या कारवाईशिवाय तुमच्यावर इतरही अनेक दंड आकारला जाऊ शकतो.

तोट्याची तडजोड नाही
व्यवसायात कोणत्याही प्रकारचा तोटा झाला असेल तर त्यात प्राप्तिकर खात्यातंर्गत करासाठी तडजोड होत नाही. मात्र वेळेत प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्या करदात्याला त्यात दिलासा मिळू शकतो. जर रिटर्न देय तारखेच्या आत भरला नाही, तर तुम्ही भविष्यातील कोणत्याही नफ्यावर हे नुकसान सेट करू शकत नाही. अपवाद, घराच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास, तोट्याची तडजोड करता येते.

व्याज देखील भरावे लागेल
रिटर्न उशिरा भरल्यास केवळ दंड भरावा लागणार नाही, तर कराच्या रकमेवर व्याजही भरावे लागेल. कलम 234A अंतर्गत, दरमहा देय करावर 1% दराने व्याज भरावे लागेल. त्यामुळे जोपर्यंत कर भरला जात नाही तोपर्यंत आयटीआर भरण्याची परवानगी दिली जाणार नाही. कलमांतर्गत व्याजाची गणना अंतिम मुदतीनंतरच्या तारखेपासून सुरू होईल, म्हणजे 2021-22 आर्थिक वर्षासाठी 31 ऑगस्ट 2022 या तारखेपासून व्याजाचे चक्र सुरु होईल. त्यामुळे, तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

परतावा मिळण्यास विलंब
ITR उशीरा भरला म्हणजे उशीरा परतावा मिळेल. तुम्ही लवकरच टॅक्स रिटर्न भरल्यास रिफंडही लवकरच मिळेल. समजा तुमचा टीडीएस जास्त कापला गेला असेल किंवा तुम्ही चुकून जास्त कर भरला असेल, तर रिटर्न अंतिम मुदतीपूर्वी भरले पाहिजे. तसे न केल्यास परतावा मिळण्यास विलंब होईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button