ताज्या बातम्यादेश-विदेश

महिला जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेली झाली लखपती


मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून एक महिला रस्त्यातून जाता जाता लक्षाधीश झाली आहे. गेंदाबाई नावाची आदिवासी महिला जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती.
तिला रस्त्यात एक अनमोल 4 कॅरेट 39 सेंटचा हिरा सापडला. जो तिने हिरा कार्यालयात जमा केला आहे. या हिऱ्याची किंमत साधारण 20 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आबे. सध्या या हिऱ्याची बोली लावण्यात येणार आहे.गेंदा बाई पन्नानगरमधील पुरुषोत्तमपूरच्या वॉर्ड 27 मध्ये राहते. नेहमीप्रमाणे बुधवारीही ती लाकडं आणण्यासाठी जंगलात गेली होती. रस्त्यात तिला एक चमचमणारा दगड दिसला. तिने तो घेतला आणि घरी येऊन पतीला दाखवला.

त्यावेळी पती-पत्नी तो चमकणारा दगड ओळखू शकले नाही. ते दोघे थेट हिरा कार्यालयात पोहोचले. हिरा पारखीने सांगितलं की, हा साधारण दगड नाही तर महागडा हिरा आहे. याचं वजन 4 कॅरेट 39 सेंट आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button