कुलूप तोडून चोरट्यांनी २२ तोळे सोन्यासह रोख ३ लाख रूपये पळवले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : कडा,सेवानिवृत्त सैनिक पत्नीसह शेतात गेल्याचे आणि आजी-नातू कामानिमित्त घराला कुलूप लावून गेल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची खळबळजनक घटना सांगवी पाटण येथे घडली आहे.
चोरट्यांनी कपाटातील २२ तोळे सोन्यासह रोख ३ लाख रूपये लंपास केले आहेत.

आष्टी तालुक्यातील कडा डोईठाण रोडवर असलेल्या सांगवी पाटण येथे सेवानिवृत्त सैनिक संदिप भिमराव खिलारे हे पत्नीसह शेतात पिकाची खुरपणी करण्यासाठी गेले होते. तर घरी थांबलेले आजी-नातू घराला कुलूप लावून गावात गेले होते. आजीनातू घरी येताच त्यांना धक्काच बसला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे त्यांना दिसले. आत पाहणी केली असता कपाट तोडून त्यातील २२ तोळे सोन्यासह रोख ३ लाख रूपये असा ऐवज लंपास झाला होता.

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजेद्र पवार, पोलिस अंमलदार बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.