धनुष्यबाण देऊन सत्कार,धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडेच येईल,सूचक इशारा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दादासाहेब रावल उद्योग समूहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ग्लुकोज फार्मास्युटिकल नवीन प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला.

यावेळी देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Denvendra Fadanvis ) प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांचा चांदीची गदा व धनुष्यबाण ( Bow and Arrow ) देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी, धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडेच येईल, असा सूचक इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
धुळे : हनुमान चालीसा म्हणण्यास आता कुठलीही बंदी नाही. ज्याला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तो हनुमान चालीसा म्हणू शकतो. त्यामुळे आता हनुमानाची गदा पूजा करण्यासाठी ठेवायची आहे. तिला कोणाच्या डोक्यावर चालवण्याची आवश्यकता नाही, असा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Denvendra Fadanvis ) यांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांचे नाव न घेता मारला. सत्कारावेळी देवेंद्र फडणवीस यांना चांदीचे धनुष्यबाण आमदार जयकुमार रावल ( MLA Jayakumar Rawal ) यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रावल कुटुंबीयांनी दिलेला धनुष्यबाण ( Bow and Arrow ) हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचकडेच असेल, असे सूचक विधान केले आहे.