ताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र

पुरंदर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करणे बाबत


 



पुणे : पुरंदर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्काशीत करणे बाबत , काढून टाकण्यासाठी , मा. तहसिलदार साहेब यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अतिक्रमण धारांकाना महसूल विभागाने आपण केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात बाबत , नोटीसा दिल्या आहेत, तसेच ग्रामपंचायत हद्दीत गावठाण, येथे अतिक्रमण असेल तर ग्रामपंचायत स्तरावर नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, त्याअनुषंगाने पुरंदर तालुक्यातील निवासी ( घरासाठी ) ज्या नागरीकांनी अतिक्रमण केलेले आहे, असे अतिक्रमण नियमित करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब, यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला जाणार आहे. व रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून, निवासासाठी केलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी , रिपब्लिकन पक्षाच्या वतीने, याबाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, व घरासाठी केलेले अतिक्रमण कायम करण्यात यावे, या करीता राज्यसरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करुन, मा. तहसिलदार पुरंदर , किंवा उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब , पुरंदर – दौंड यांच्या मार्फत ,राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन देऊन, याबाबत राज्यसरकारच्या वतीने , न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात यावी अशी मागणी करुन , घरासाठी केलेले अतिक्रमण कायम करणेकामी , रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला जाणार आहे, त्यामुळे ज्या नागरीकांनी शासकीय जागेत घर बांधले आहे अशा नागरीकांनी आपल्याकडे असलेल्या प्राप्त पुराव्यासह पुरंदर सुविधा केंद्र , सासवड नारायणपूर रोड, तहसिलदार कार्यालय सासवड येथे संपर्क साधावा असे आव्हाहन केले आहे

विष्णूदादा भोसले
कार्याध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश, मो.नं. ९५५२७५३५६१


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button