क्राईमताज्या बातम्याधाराशिवमहत्वाचेमहाराष्ट्र

विनयभंगाचा गुन्हा दाखल,महाराज मठ सोडून फरार


धाराशिव जिल्ह्यातील मलकापूर येथील स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला ब्लॅकमेल करून विनयभंग केल्याप्रकरणी लोमटे महाराजांच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
बीड जिल्ह्यातील शिष्य असलेल्या पीडित महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर अध्यात्मिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल होताच लोमटे महाराज फरार झाला आहे. ही वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि भक्तांनी महाराजांच्या मलकापूर येथे मठामध्ये मोठी गर्दी करायला सुरुवात केली आहे .या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे .अशी घडली घटना

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये मलकापूर इथं श्री शेत्र दत्त मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. एकनाथ लोमटे महाराज या देवस्थानचे मठापती आहेत. चमत्कारी बाबा म्हणून लोमटे महाराजांची ख्याती आहे. ज्यांना मुलं बाळ होत नाही किंवा आजार बरा होत नाही असे राज्यातील अनेक जण महाराजांच्या दर्शनासाठी येतात.

मंत्र उपचार आणि प्रसाद दिल्याने मनातील मनोकामना पूर्ण होते अशी महाराजांची ख्याती आहे. बीड जिल्ह्यातील एक महिला नियमित महाराजांच्या दर्शनासाठी येत होती. त्याप्रमाणेच गुरुवारी 28 जुलै रोजी ती महाराजांच्या दर्शनासाठी मलकापूर येथील मठामध्ये आली दर्शन घेऊन ही महिला परिसरातील एका झाडाखाली बसली होती.

त्यावेळी महाराजांच्या एका शिष्याने त्या महिलेला महाराज दर्शनासाठी बोलावतात असं सांगितलं आणि एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्या खोलीत महाराज एकटेच बसले होते. महाराजांनी त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने विरोध करताच महाराजांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. गेल्या वेळी दर्शनासाठी आलेली असताना प्रसादाचा पेढा दिल्यानंतर बेशुद्ध झाली आणि त्यानंतर मी तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे असं सांगत महाराज त्या महिलेला ब्लॅकमेल करू लागला.

महिला तरीही राजी होत नाही हे लक्षात येताच महाराजांनी त्या महिलेचा विनयभंग केला .आरडा, ओरड करून ती महिला कशीबशी त्या महाराजांच्या तावडीतून निसटली आणि पोलिसात जाऊन तक्रार दिली असे या महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button