क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

73 व्या वर्षी लग्णाचा चंग सुमनने दाखवले वेगळेच रंग


एका 73 वर्षीय व्यक्तीला पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करणं चांगलच महागात पडलं आहे. जून 2021 मध्ये लग्न केलेल्या बायकोने असे काही केले की त्यांना पोलीस स्थानकात धाव घ्यावी लागली.मात्र तक्रार नोंदवाविण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेऊनही त्यांची तक्रार कुठेही नोंदवण्यात आली नाही. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

जयपूरच्या बजाज नगर भागातील ही घटना आहे. बजाज नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय रामधन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, जून 2021 मध्ये त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रामधनने डिसेंबर 2021 मध्ये आर्य समाजात सुमन नावाच्या विधवा महिलेशी वैदीक पद्धतीने लग्न केले. मात्र लग्नाच्या 5 दिवसानंतरच सुमनने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. तिचे वागणे बदलले आणि रामधनला ती धमकवायला लागली. घराचा अर्धा हिस्सा आणि फ्लॅट मिळवून देण्याची तिने मागणी केली. एवढेच नाही तर यासोबतच दरमहा 20 हजार रुपये देण्याचीही तिने मागणी केली. तिच्या या मागण्या पूर्ण न केल्यास रामधनवर खोटे आरोप करुन तुरुंगात पाठवेन अशी धमकी दिली. तसेचत्याच्या जेवणात विष मिसळून जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित रामधनच्या म्हणण्यानुसार, घराच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सून आणि नातवंडांशीही सुमन बोलू देत नव्हती. रामधनला ती शिवीगाळ आणि मारहाण करायची. लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांनंतर मार्च 2022 मध्ये सुमनने रामधनशी भांडण करून अर्धे घर तिच्या नावावर करायला सांगत घर सोडले. सुमन निघून गेल्यानंतर रामधनने कपाटात पाहिले असता त्यात लाखो रुपयांचे दागिने, दोन लाख रुपयांची रोकड गायब असल्याचे दिसून आले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button