धनंजय मुंडे समर्थक महिला पदाधिकारी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. परळी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे समर्थक महिला पदाधिकारी सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

सुषमा अंधारे प्रचंड आक्रमक आणि अॅक्टिव्ह असलेल्या महिला पदाधिकारी आहेत. समाजमाध्यमात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष करून त्यांची रोख ठोक शैलीतील भाषणे युट्युबवर प्रचंड व्हायरल होतात. परळीतील सक्रिय महिला पद्धधिकाऱ्याने राष्ट्रवादीची साथ सोडल्याने, हा धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.