पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चेन्नईजवळील ममल्लापुरम येथे चेस ऑलिम्पियाड 2022 च्या 44 व्या हंगामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी उद्घाटन केले. चेन्नईतील 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उद्घाटन समारंभात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला.

चेन्नई ( तामिळनाडू ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी गुरुवारी संध्याकाळी चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियममध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले. 28-29 जुलै रोजी पंतप्रधान गुजरात आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. मिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ( Tamil Nadu CM MK Stalin ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. ( Chess Olympiad Opening Ceremony )

भव्य दिव्य असे उद्घाटन : चेन्नईतील जेएलएन इनडोअर स्टेडियमवर रविवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे भव्य उद्घाटन झाले. PM मोदींनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियमवर प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचा शुभारंभ केला. मशालने 40 दिवसांच्या कालावधीत देशातील 75 प्रतिष्ठित ठिकाणांचा प्रवास म्हणजे सुमारे 20,000 किमी प्रवास केला. FIDE स्वित्झर्लंडमधील मुख्यालयात जाण्यापूर्वी ते महाबलीपुरम येथे संपणार आहे.