महाराष्ट्रराजकीय

ओबीसी नेते छगन भुजबळ हे मोठे नेते असून त्यांना मुख्यमंत्री बनवलं तर चांगलंच आहे


एकीकडे खासदारकीच्या चर्चा तर दुसरीकडे छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली? ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानंतर तर्कवितर्कांना उधाण..



महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकांचा धुराळा. ते झाले की लगेचच विधानसभेच्या हालचाली सुरु होतील. दरम्यान आता नाशिकमधील लोकसभा जागेचा तिढा सुटून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना देण्याचे जवळपास ठरले आहे.

त्यामुळे ते खासदारकी लढवतील असे म्हटले जात आहे. दरम्यान हे एकीकडे सुरु असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने विविध तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

नेमेके कुणी काय म्हटले?
सध्या रासपचे महादेव जानकर हे लोसकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचं एक वक्तव्य चर्चेत आले आहे. ते म्हणले आहेत की, ओबीसी नेते छगन भुजबळ हे मोठे नेते असून त्यांना मुख्यमंत्री बनवलं तर चांगलंच आहे असं ते म्हणाले आहेत. याआधीही त्यांनी भुजबळ याना मुख्यमंत्री करावं असे वक्तव्य केले होते.

महादेव जानकरांनी जालना जिल्ह्यातील परभणी लोकसभा मतदारसंघात प्रचारदौऱ्या दरम्यान हे वक्तव्य केले असले तरी भुजबळ याना मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आणले जात आहे का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मराठा नेते माझ्यासोबत आहेत. मराठा मतांचे त्यामुळे ध्रुवीकरण होणार नसल्याचे जानकर यांनी म्हंटले आहे. दरम्यान भुजबळ साहेब हे आदरनीय तसेच मोठे नेते असल्याने त्यांनी मुख्यमंत्री झालं तर काय वाईट आहे असं वक्तव्य जानकरांनी केले.

चर्चांना उधाण
सध्या भुजबळ यांना नाशिक मधून खासदारकी दिली जावी असा प्रस्ताव आहे. ते तिकटी फायनल होऊ शकते असे म्हटले जाते. एकीकडे असे असले तरी जानकर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी या आधी अनेक बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा झाली होती आता अशातच जानकरांच्या वक्तव्याने भुजबळांचं नाव चर्चेत आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button