ताज्या बातम्यादेश-विदेशमनोरंजनमहत्वाचे

बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन


बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन
क्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत. मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही क्रिती सेनन आजच्या काळात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती सेननने आज बॉलिवूडमध्ये स्वतःसाठी एक वेगळे आणि मोठे स्थान निर्माण केले आहे.सोशल मीडियावरही क्रिती सेननची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. क्रिती सेननच्या हातात आज अनेक मोठे चित्रपट असले, तरी तिचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता.

इंजिनियर क्रिती!

क्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए आहेत. तर, आई गीत सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. दिल्लीत जन्मलेल्या क्रिती सेननने नोएडा येथील कॉलेजमधून बीटेकची पदवी पूर्ण केली आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. सुपरस्टार महेश बाबूसोबत क्रिती सेनन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.

पहिल्या रॅम्प वॉकला कोसळलं रडू!

क्रिती सेननने आपलं करिअर यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अभिनयासोबतच क्रितीने मॉडेलिंग देखील केले आहे. मॉडेलिंग दरम्यान पहिल्या रॅम्प वॉकच्या वेळी आपण रडल्याचं, क्रिती सेननने स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं. एका मुलाखतीत क्रिती सेननने तिच्या पहिल्या रॅम्प वॉकबद्दलचा किस्सा सांगितला होता. पहिल्या रॅम्प वॉकमध्ये तिच्याकडून काही चूक झाली होती, त्यानंतर तिला आणि सोबतच्या 20 मॉडेल्सना कोरिओग्राफरने चांगलेच फटकारले होते. यामुळे क्रिती घाबरली आणि रडू लागली होती. यावेळी तिच्या आईनेच तिची समजूत काढली होती.

साऊथ ते बॉलिवूड प्रवास

तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर ‘नेनोक्कडाइन’ हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी क्रिती सेननला समीक्षकांकडून खूप कौतुकही मिळाले. ‘नानोक्कडाइन’ 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर क्रिती सेननने बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिरोपंती’ हा तिचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट होता. हा चित्रपट देखील 2014मध्येच आला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाच्या यशानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. ‘हिरोपंती’, ‘दिलवाले’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’, ‘पानिपत’, ‘हाऊसफुल’, ‘मिमी’ अशा एकापेक्षा हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button