मनसेकडून आंदोलन ,टोल वसूली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याची 2 मे रोजी मुदत संपली असताना देखील टोल नाका सुरू असल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेनेकडून आंदोलन करण्यात आले.
अभिनव पध्दतीने आंदोलन करत काही काळ टोल नाका बंद करण्यात आला. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर उभे राहून गाड्या सोडल्या.

किणी आणि तासवडे टोलनाका राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या टोलनाक्यावरून पुन्हा वसूली करण्यात आली आहे. महामार्गावरील सहा पदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले नसतानाही टोलवसूली होत असल्याने मनसेकडून आंदोलन करण्यात आले. मनसेकडून टोल वसूली थांबलीच पाहिजे, वाहनधारकांची लूट थांबलीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.